विराट कोहलीच्या टीम इंडियाकडून ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात  आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 300 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताने पहिल्या डावातील 322 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला आहे.

याबरोबरच भारतीय संघाने एक खास विक्रमही केला आहे. भारताची 322 धावांची आघाडी ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्या डावातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आघाडी ठरली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर 1998 ला इडन गार्डनवर झालेल्या सामन्यातील आघाडी आहे. त्यावेळी भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 400 धावांची आघाडी घेतली होती.

तसेच 1979 ला मुंबईमध्ये भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 298 धावांची आघाडी घेतली होती. या विक्रमाला विराट कोहली कर्णधार असणाऱ्या भारतीय संघाने मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च आघाडीच्या विक्रमाची नोंद केली आहे.

त्याचबरोबर आशिया खंडाबाहेर कसोटी खेळताना भारताने घेतलेली 322 धावांची आघाडी ही भारताची चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च आघाडी ठरली आहे.

भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावातील सर्वोच्च आघाडी –

400 – इडन गार्डन, 1998

322 – सिडनी, 2019

298 – मुंबई, 1979

292 – मेलबर्न, 2018

266 – हैद्राबाद, 2013

भारताची आशिया खंडाबाहेरील प्रतिस्पर्धी संघाविरुद्धच्या पहिल्या डावातील सर्वोच्च आघाडी –

373 – विरुद्ध विंडीज, ग्रॉस इस्लेट, 2006 (अनिर्णीत)

355 – विरुद्ध इंग्लंड, लीड्स. 2002 (विजय)

323 – विरुद्ध विंडीज, नॉर्थ साउंड, 2016 (विजय)

322 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2019 (??)

319 – विरुद्ध इंग्लंड, ओव्हल, 2007 (अनिर्णित)

304 – विरुद्ध विंडीज, किंग्सटन, 2016 (अनिर्णित)

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

कुलदिप यादव असा पराक्रम करणारा केवळ दुसराच चायनामन गोलंदाज

टीम इंडियाच्या बाबतीत ती गोष्ट कधीच नाही घडली

कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले

३३ वर्षांनंतर थायलंडवर विजय मिळवण्यास टीम इंडिया उत्सुक