न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम

न्यूझीलंडच्या 17 वर्षीय अॅमेलिया केरने महिला क्रिकेटमधिल 21 वर्षांपूर्वीचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडत जागतिक महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला.

बुधवार दि. 13 जूनला न्यूझीलंड विरूद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात अॅमेलिया केरने 145 बॉलमध्ये दोन षटकार आणि 31 चौकारांच्या मदतिने नाबाद 232 धावा करत महिला क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी दुसरी महिली क्रिकेटपटू ठरली.

यापूर्वी महिला क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने पटकावला आहे. बेलिंडा क्लार्कने 1997 साली मुंबई येथे महिला एकदिवसीय विश्वचषकात डेन्मार्क विरूद्ध नाबाद 229 धावा केल्या होत्या.

वेलिंग्टन येथे जन्मलेल्या अॅमेलिया केरने वयाच्या पंधराव्या वर्षी 2016 साली पाकिस्तान विरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पन केले आहे. तीने खेळलेल्या 20 एकदिवसीय सामन्यात 67.66च्या सरासरीने 406 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत 20 सामन्यात 36 बळी मिळवले आहेत.

या द्विशतकाबरोबर अॅमेलिया केरने भारताच्या विरेंद्र सेहवागला (219) मागे टाकत महिला व पुरूषांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्यांच्या एलिट लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे.

या एलिट लिस्टमध्ये भारताचा सलामिवीर रोहित शर्मा (264) अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी नूझीलंडचा मार्टीन गुप्टील (237) आहे.