वनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्यात एक खास विक्रम म्हणजे वनडेत द्विशतक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.

त्याने आज मोहाली वनडेत १५३ चेंडूत २०८ धावा करताना १२ षटकार आणि १३ चौकार खेचले आहे. श्रीलंका वनडे मालिकेसाठी त्याने त्याला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सोपवले गेले आहे. पहिल्या वनडेत तो २ धावांवर तो बाद झाला होता. त्या पराभवाची परतफेड आज रोहितने दुसऱ्या वनडेत केली आहे.

यापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत कर्णधार म्हणून द्विशतक करणाऱ्याचा पहिला मान भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागला मिळतो. त्याने इंदोर येथे झालेल्या वनडेत विंडीजविरुद्ध २१९ धावांची खेळी केली होती.

वनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२१९ वीरेंद्र सेहवाग विरुद्ध विंडीज
२०८* रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका
१८९ सनाथ जयसूर्या विरुद्ध भारत
१८६* सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलँड