भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम

दुबई। आज (२८ सप्टेंबर) एशिया कप 2018 चा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पण बांगलादेशकडून लिटॉन दास आणि मेहदी हसन या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करत बांगलादेशला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. दासने या सामन्यात त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक झळकावले आहे.

त्याने 28. 4 षटकात त्याचे हे शतक पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने बांगलादेशकडून क्रिकेटच्या कोणत्याही अंतिम सामन्यात खेळताना सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम शब्बीर रेहमानच्या नावावर होता.

त्याने भारताविरुद्धच याचवर्षी मार्चमध्ये पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 77 धावा केल्या होत्या.

बांगलादेशला दास आणि मेहदी हसनने जरी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करुन चांगली सुरुवात दिली असली तरी हसन 32 धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशची मधली फळी कोलमडली आहे.

हसनला केदार जाधवने बाद केल्या नंतर काही वेळातच इम्रुल काइज, मुशफिकर रहिम आणि मोहम्मद मिथून यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. इम्रुलला 2 धावांवर असताना युजवेंद्र चहलने पायचीत बाद केले. तर मुशफिकरला केदारने जसप्रीत बुमराहकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 5 धावा केल्या.

यानंतर रविंद्र जडेजाने मिथूनलाही 2 धावांवर धावबाद करत बांगलादेशला चौथा धक्का दिला. त्याच्या पाठोपाठ कुलदीप यादवने लगेचच महमुद्दलाहला 4 धावांवर बाद केले. त्यामुळे बांगलादेशची आवस्था 5 बाद 152 धावा अशी झाली.

बांगलादेशकडून क्रिकेटच्या कोणत्याही अंतिम सामन्यात खेळताना सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे फलंदाज-

101* धावा – लिटॉन दास, विरुद्ध भारत(वनडे, दुबई, 2018)

77 धावा – शब्बीर रेहमान, विरुद्ध भारत (टी20, कोलंबो, 2018)

76 धावा – महमुद्दलाह, विरुद्ध श्रीलंका (वनडे, मिरपूर, 2018)

68 धावा – शाकिब अल हसन, विरुद्ध पाकिस्तान (वनडे, मिरपूर,2012)

महत्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात हा दिग्गज करणार तमिळ थलायवाजचे नेतृत्व

आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका

एशिया कप २०१८: अंतिम सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया