२०१७ वर्ष हे विराट कोहलीचेच, मोदींनाही टाकले मागे

0 2,339

नवी दिल्लीट्विटर रिपोर्ट्सप्रमाणे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे फॉलोव्हर्स हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा तब्बल ९%नी जास्त वाढत आहे. २०१७मधील ही आकडेवारी जगातील प्रसिद्ध अशा मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने जाहीर केली आहे.

या रिपोर्टप्रमाणे २०१७मध्ये मोदींचे फॉलोव्हर्स ५२%ने वाढून ३७.५ मिलियन झाले आहेत तर विराटाचे ह्याच काळात फॉलोव्हर्स तब्बल ६१%ने वाढून २४.६ मिलियन झाले आहेत.

असे असले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरीही भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोव्हर्स असलेले व्यक्ती आहेत. ही आकडेवारी ४ डिसेंबर पर्यंतची आहे. गेल्यावर्षी ३१ डिसेंबर २०१६ रोजी विराटाचे फॉलोव्हर्स २०.८ मिलियन होते

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील फॉलोव्हर्स वाढीत (ग्रोथ) अव्वल असून सचिनच्या फॉलोव्हर्समध्ये ५६%नी वाढ झाली आहे.

Twitter Followers 2 346x350 - २०१७ वर्ष हे विराट कोहलीचेच, मोदींनाही टाकले मागेयावर्षी प्रथमच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी भारतात सर्वाधिक फॉलोव्हर्स असलेल्या टॉप १० व्यक्तींमध्ये स्थान मिळवले आहे.

या यादीत बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख, दबंग सलमान खान, खिलाडी अक्षय कुमार, मिस्टर पर्फेक्टनिस्ट आमिर खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ह्रितिक रोशन हे अन्य भारतीय आहेत.

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या फॉलोव्हर्समध्ये यावर्षी ४०%ने वाढ झाली असून शाहरुखचे ३०.९ मिलियन तर सलमान खानचे २८.५% फॉलोव्हर्स आहेत.

ट्विटरवर २०१७ मध्ये फॉलोव्हर्स वाढ (ग्रोथ) सार्वधिक असलेले भारतीय
६१% विराट कोहली
५६% सचिन तेंडुलकर
५२% नरेंद्र मोदी

Comments
Loading...
%d bloggers like this: