भारताचा पहिल्या कसोटीमध्ये मोठा विजय

गॉल – श्रीलंकेतील गॉल येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे.

दुसऱ्या डावात भारताने लंकेपुढे चौथ्या डावात ५५० धावांच लक्ष ठेवलं होत परंतु लंकेचा दुसरा डाव ७६ षटकात २४५/८ धावांत आटोपला. जखमी कर्णधार रंगना हेराथ आणि अस्लेला गुणरत्ने फलंदाजीसाठी मैदानात आले नाहीत.

आज भारताकडून विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताचा दुसरा डाव २४०/३ वर घोषित केला. त्यांनतर ५५० धावांच लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या लंकेला चौथ्याच दिवशी हार पत्करावी लागली. दिमूथ करूणारत्नेने चांगला खेळ करत ९७ धावांची तर यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने (६७) खेळी करत त्याला साथ दिली अन्य खेळाडूंमध्ये कुशल मेंडीस (३६) आणि दिलरूआन परेराने २१ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीमध्ये भारतीय फिरकीने पुन्हा एकदा कमाल दाखवताना रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर उमेश यादव व मोहम्मद शमीने १-१ विकेट घेतली.