यष्टीरक्षकाने झेल सोडला असतानाही गोलंदाजाने केले सेलिब्रेशन

8 आॅगस्टपासून सुरु झालेल्या करेबियन प्रिमियर लीगमध्ये यष्टीरक्षकाने झेल सोडला असतानाही गोलंदाजाने अजाणतेपणे सेलिब्रेशन करण्याचा एक मजेदार किस्सा घडला आहे.

त्रिनबॅगो नाइट रायडर्स विरुद्ध सेंट लुसिया स्टार्स यांच्या दरम्यान पार पडलेल्या सामन्यात हा किस्सा घडला. विशेष म्हणजे हा या लीगचा पहिलाच सामना होता.

झाले असे की सेंट लुसिया संघ 196 धावांचा पाठलाग करत असताना 9 व्या षटकात त्रिनबॅगोचा वेगवान गोलंदाज अली खान गोलंदाजी करत होता.

या षटकातील 5 व्या चेंडूवर सेंट लुसियाचा अँड्रे फ्लेचर 2 धावांवर नाबाद खेळत असाताना त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू त्रिनबॅगो संघाचा यष्टीरक्षक दिनेश रामदिनच्या दिशेने गेला.

हा झेल रामदिनने जवळजवळ पकडलाच होता, परंतू नंतर त्याच्या हातून चेंडू निसटला. पण ही गोष्ट अली खानच्या लक्षात न आल्याने त्याने विकेट मिळाल्याच्या आनंदात सेलिब्रेशन करायला सुरुवात केली.

तसेच त्याने सेलिब्रेट करताना जर्सीवरील संघाच्या लोगोला किस केले. त्याला सेलिब्रेशनमध्ये संघसहकाऱ्यांचीही साथ मिळाली पण लगेचच त्यांना रामदिनने झेल सोडला असल्याचे कळाले.

हा सामना बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सहमालक असणाऱ्या त्रिनबॅगो नाइट रायडर्सने 100 धावांनी जिंकला.

या सामन्यात त्रिनबॅगो संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कॉलीन मुनरो आणि रामदिनने अर्धशतके केली. मुनरोने 48 चेंडुत 68 धावा तर रामदिनने 27 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर त्रिनबॅगोने 6 बाद 195 धावा केल्या.

याच्या प्रतिउत्तरादाखल सेंट लुसियाचा संघ 95 धावातच सर्वबाद झाला. सेंट लुसियाचा डाव 17.3 षटकात संपुष्टात आणण्यात ब्रोवो आणि फवाद अहमदने मोलाचा वाटा उचलला. या दोघांनी सेंट लुसियाच्या प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते