ऑस्ट्रेलियाकडून करणार आज हा मोठा खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण

चेन्नई । भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामना आज येथे थोड्याच वेळात सुरु होणार असून ऑस्ट्रेलिया या सामन्यात एका नवीन खेळाडूला पदार्पणाची संधी देणार आहे. जखमी ऍरॉन फिंचच्या जागी हिल्टन कार्टराइट हा आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण करणार आहे.

फिंच सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे हिल्टन कार्टराइटला ऑस्ट्रेलियावरून तातडीने बोलवून आणण्यात आले होते. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून २ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात २७.५०च्या सरासरीने ५५ धावा केल्या आहेत. हिल्टन ऑस्ट्रेलियाकडून वनडे सामना खेळणारा २२१ वा खेळाडू असेल.