भारताची धावपटू हिमा दासने १५ दिवसात जिंकले चौथे सुवर्णपदक

भारताची स्टार धावपटू हिमा दासने बुधवारी चेक रिपब्लिकमध्ये सुरु असलेल्या टॅबोर अथलेटिक मीटमध्ये 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. हे तिचे मागील 15 दिवसांमधील चौथे सुवर्णपदक आहे. तिने 200 मीटरची शर्यत 23.25 सेकंदाच पूर्ण केली आहे.

या शर्यतीत हिमाची सहकारी व्हीके विस्मया दुसऱ्या क्रमांकावर आली. तिने 23.43 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.

हिमाने गेल्या 15 दिवसांतील पहिले सुवर्णपदक 2 जूलैला पोलंडमध्ये पोजनान ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्सस्पर्धेत 200 मीटरच्या शर्यतीत 23.65 सेकंदाची वेळ नोंदवत जिंकले होते. त्यानंतर तिने 7 जूलैला दुसरे सुवर्णपदक पोलंडलाच कुटनो ऍथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरच्या शर्यतीत जिंकले. ही शर्यत तिने 23.97 सेकंदात पूर्ण केली होती.

यानंतर तिने 13 जूलैला चेक रिपब्लिकमध्ये हुई क्लांदो मेमोरियल ऍथलेटिक्समध्ये 200 मीटरची शर्यत 23.43 सेकंदात पूर्ण करत तिसरे सुवर्णपदक जिंकले.

हिमाही आसामची रहिवासी असून सध्या आसाम राज्यात पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे केले जात आहेत. हिमानेही पुरग्रस्त लोकांना मदत करण्याची अपील केले असून तिने तिची आर्धी सॅलरी मदतीसाठी दिली आहे.

हिमाबरोबरच पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत मोहम्मद अनसने 45.40 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच या शर्यतीत टॉम नोह निर्मल 46.59 सेंकदांची वेळ घेत दुसरा आला. तर केएस जीवन 46.60 सेकंद वेळ नोंदवत तिसरा आला आणि एपी जाबीर हा चौथा आला. त्याला 47.16 सेंकदाचा वेळ लागला.

13 जूलैलै अनसने 400 मीटर शर्यतीत 45.21 सेंकदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे तो वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठीही पात्र ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी असे केले केन विलियम्सनचे कौतुक

विश्वचषकातील इंग्लंडच्या या स्टार खेळाडूला आता कसोटी पदार्पणाचीही संधी