स्व. हिंदुह्रदयसम्राट चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत असे होणार उपांत्य फेरीचे सामने

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय हनुमान क्रीडा मंडळ चामटोळी आयोजित स्व. हिंदुह्रदयसम्राट चषक २०१९ भव्य कबड्डी स्पर्धाचा आयोजन केलं आहे. पंचायत समिती सदस्य बाळाराम कांबरी हे आयोजक आहेत.

१० ते १३ जानेवारी या कालावधी मध्ये या स्पर्धा कांबरी फार्म चामटोली, बदलापूर-कर्जत हायवे येथे सुरू आहेत. काल दिनांक (१२ जानेवारी) झालेल्या बादफेरीच्या सामन्यात पहिल्या उपउपांत्य पूर्व सामन्यात नंदकुमार क्रीडा मंडळ बदलापूरने शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण संघाचा ३३-१८ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

दुसऱ्या उपउपांत्य पूर्व सामना ग्राफिन जिमखाना वाशी विरुद्ध आत्माराम क्रीडा मंडळ, डोंबिवली यांच्यात झाला. आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली संघाने ३७-२१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ओम कबड्डी संघ कल्याण संघाने माऊली मंडळ ठाणेच्या तर छत्रपती डोंबिवली संघाने होतकरू ठाणे संघाचं पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

आज होणारे सामने अ गट:

उपांत्य सामना क्रमांक १
नंदकुमार क्रीडा मंडळ, बदलापूर विरुद्ध ओम कबड्डी संघ कल्याण

उपांत्य सामना क्रमांक २
छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली विरुद्ध आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली

अंतिम सामना
उपांत्य सामना क्रमांक १ विजयी विरुद्ध उपांत्य सामना क्रमांक २ विजयी