हिटमॅन रोहित शर्माने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम

मुंबई। आज( 29 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात चौथा वनडे सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.

त्याने या सामन्यात 98 चेंडूत त्याचे 21 वे वनडे शतक पूर्ण केले. त्याने 137 चेंडूत 162 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 20 चौकार आणि 4 षटकार मारला.

याबरोबरच त्याने या सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा एक विक्रमही मोडला आहे.

रोहितने या सामन्यात मारलेल्या चार षटकारांमुळे त्याचे वनडे क्रिकेटमध्ये 198 षटकार झाले आहेत.

त्याबरोबरच रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. हा विक्रम करताना त्याने सचिन तेंडुलकरच्या 195 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने आत्तापर्यंत 331 वनडे सामन्यात 218 षटकार मारले आहेत. तसेच तो वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मारले आहेत. या यादीत रोहित सातव्या क्रमांकावर आला आहे.

रोहितने हा विक्रम त्याच्या 192 व्या सामन्यात केला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-

218 – एमएस धोनी

198 – रोहित शर्मा

195 – सचिन तेंडुलकर

190 – सौरव गांगुली

155 – युवराज सिंग

महत्त्वाच्या बातम्या:

या कारणासाठी चौथा वनडे सामना विराटसाठी आहे खास

टीम इंडियात सोडा युवराज आणि हरभजनला पंजाबच्या रणजी संघातूनही वगळले

७ वर्षांपुर्वीचा तेंडुलकर-सेहवागचा विक्रम हिटमॅन- गब्बरने मोडला