सामन्यादरम्यान या महिला हॉकीपटूने केले ८आठवड्यांच्या मुलीला स्तनपान, जगभरातून कौतूकाचा वर्षाव

कॅनडाच्या एका हॉकीपटूने आईसाठी तिचे मूल सर्वात महत्वाचे असते हे दाखवून दिले आहे. साराह स्मॉल हे या हॉकिपटूचे नाव असून तिने एका सामन्यादरम्यान तिच्या लहान मुलीचे संघाच्या ड्रेससिंग रूममधेच स्तनपान केले.

साराह ही हॉकीची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे ती मुलीला जन्म दिल्यानंतर लगेचच ८ आठवड्यात तिच्या संघात खेळण्यासाठी परतली. त्यानंतर एका सामन्यादरम्यान तिला लक्षात आले की ती सकाळी तिच्या मुलीला दूध देण्याचे विसरली म्हणून तिने सामन्यातील विश्रांतीच्या वेळी ड्रेससिंग रूममध्ये जाऊन तिच्या लहान मुलीला दूध पाजले.

साराहचे संघसहकारीही त्यावेळी उपस्थित होते परंतु त्यांनी तिला तिचा वेळ दिला आणि ते त्यांच्या तयारी करण्यात मग्न झाले. याबद्दल ती सीबीसीला सांगताना म्हणाली, ” संघासहकारी त्यांची तयारी करण्यात व्यस्त होते. यात काही विशेष नाही. त्यांनी वाटते की ती खूप गोड मुलगी आहे. त्यामुळे हे सर्व नेहमीसारखेच होते.”

साराहने तिच्या मुलीला स्तनपान करताना तिला झाकण्याचा प्रयत्न केला होता, पण यामुळे तिच्या मुलीला त्रास होत होता. याबद्दल ती म्हणाली त्यावेळी यावर कोणी तिला काहीही म्हटले नाही किंवा ती काही वेगळे करतीये असे म्हणून कोणी लक्ष दिले नाही त्यामुळे तिला खूप चांगले वाटले. तसेच ती म्हणाली स्तनपानाने मुलांचेच पोषण होते त्यामुळे यात काही विशेष नाही.

तिने स्तनपान करतानाचा फोटो मिल्की वे लॅक्टेशन सर्व्हिसेस् यांना पाठवला. जो त्यांनी फेसबुकवर शेयर केला आहे. या फोटोचे लोकांनी कौतुक केले आहे. तसेच या फोटोला चांगल्या लाईक्स आणि शेयर्स देखील आले आहेत. मात्र तरीही काहींनी या फोटोवर नकारात्मक भूमिकाही मांडल्या आहेत.