जागतिक महिला हॉकी क्रमवारीत भारताची आगेकूच

नुकत्याच पार पडलेल्या महिला हॉकी विश्वचषकात उपांत्य पूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या भारतीय संघाला जागतिक हॉकी क्रमवारीत लाभ झाला आहे.

विश्वचषकातील समाधानकारक कामगिरीमुळे भारतीय संघाने दक्षिण कोरियाला मागे टाकत ९ वे स्थान मिळवले आहे.

मंंगळवारी (६ ऑगस्ट) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणारा नेदरलॅंड्स संघ अव्वल स्थानी कायम आहे.

या विश्वचषकात दमदार कामगिरी करत उपविजेतेपद मिळवणाऱ्या आयर्लंडने १८ व्या स्थानावरुन ८ व्या स्थानी झेप घेतली आहे.

तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघ आहेत.

जागतिक महिला हॉकी क्रमवारीतील अव्वल पाच संघ-

नेदरलॅंड्स- २३०० गुण

इंग्लंड- १७४८ गुण

ऑस्ट्रेलिया- १६४० गुण

अर्जेंटीना- १६१० गुण

जर्मनी- १५५१ गुण

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-फाफ डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत हा खेळाडू करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व

-मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाउल