हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) झालेल्या 12व्या सामन्यात अर्जेंटिनाने न्यूझीलंडला 3-0 असे पराभूत केले. या विश्वचषकातील सलग दुसरा सामना जिंकत अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात अर्जेंटिनाकडून मझील्ली ऑग्स्टीन,विला लुकास आणि मार्टीनेझ लुकास यांनी प्रत्येकी एक गोल केला.

एकूण 11वेळा गोल करण्यास शॉट्स करत अर्जेंटिनाचे या सामन्यात पहिलेपासूनच वर्चस्व होते. पहिल्या सत्रात दोन्ही संघाने बरोबरीचा खेळ केल्याने त्या 15 मिनिटांमध्ये एकही गोल झाला नाही. यामध्ये अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाली. पण न्यूझीलंडच्या बचाव फळीने तो रोखला.

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानेआक्रमक सुरूवात करत गोल करण्यासाठी प्रत्येकी तीन शॉट्स मारले. मात्र 23व्या मिनिटाला ऑग्स्टीनने केलेल्या गोलवर अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळाली. हा गोल ऑग्स्टीनचा या विश्वचषकातील तिसरा गोल ठरला.

37व्या मिनिटाला अर्जेंटिनाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र न्यूझीलंडचा गोलकिपर जॉयस रिचर्डने हा गोल रोखला. त्याने या सामन्यात तीन गोल रोखत उत्तम कामगिरी केली.

न्यूझीलंडचे चेंडूवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न चालूच होते. परत एकदा अर्जेंटिनाने गोल करण्यात बाजी मारत सामना 2-0 असा केला. विलाने 41व्या मिनिटाला हा गोल केला.

चौथ्या सत्रात न्यूझीलंडला गोल करण्याची संधी मिळाली होती. पहिल्या सामन्यात दोन गोल करणाऱ्या पेईलाट गोंझेलोने या सामन्यात गोल केला नसला तरी त्याचे बचावतंत्र संघासाठी लाभदायक ठरले.

मार्टीनेझने 55व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला 3-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. या विजयाने अर्जेंटिनाचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के झाले आहे. विला हा सामनावीर ठरला.

तसेच या दोन्ही संघांचे पुढील सामने 6 डिसेंबरला होणार असून पहिला सामना स्पेन विरुद्ध न्यूझीलंड आणि दुसरा सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

ISL 2018: पेनल्टी, स्वयंगोलसह दिल्ली मुंबईकडून गारद

टीम इंडियाचा अपमान करणाऱ्या आॅस्ट्रेलियन मीडियाला सुनावले आॅस्ट्रेलियन नागरिकांनी खडेबोल