हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळण्यास आयर्लंड सज्ज

भुवनेश्वर। आज (३० नोव्हेंबर) हॉकी विश्वचषकात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड असा सामना होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या ब गटातील या पहिला सामन्याला संध्याकाळी ५ वाजता सुरूवात होणार आहे.

विश्वचषकात प्रथमच हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. तर २०१३नंतर या संघांमध्ये दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून त्यांनी यामध्ये ८ गोल केले आहेत. तर आयर्लंडचा संघ फक्त दोनच गोल करू शकला.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया विजेतेपदाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरणार आहे. त्यांनी १९८६, २०१० आणि २०१४ला विजेतेपद मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील जॅमी डॉयर आणि मार्क नोल्स या अनुभवी खेळाडूंची संघाला उणीव भासेल. मात्र आजच्या सामन्यात ते जिंकण्याच्या विचारानेच उतरणार आहेत. त्यांच्यामध्ये १० नवीन खेळाडू सामील झाले आहेत.

” आयर्लंडच्या संघाला कमी लेखणे योग्य नाही. कारण कोणता संघ कसा खेळेल हे सांगता येत नाही. तसेच आम्हांला त्यांच्या बरोबर खेळण्याचा अनुभव नाही”, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक कोलिन बॅच म्हणाले.

तर आयर्लंडचा संघ तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळणार आहे. याआधी ते १९७८ आणि १९९० च्या विश्वचषकात खेळले होते. पण मागील काही वर्षापासून त्यांच्या संघात अनेक सुधारणा झाल्या आहेत.

२०१६च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्यावर तसेच २०१६च्या युरो हॉकी चॅम्पियनशीप या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिले असून ते जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर आहेत.

आयर्लंडच्या संघातील १४ खेळाडूंना युरोप लीगचा अनुभव आहे. तसेच १० खेळाडू २०१६च्या ऑलिंपिकमध्ये खेळलेले आहेत.

तसेच यावर्षी प्रथमच विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. ब गटातील आजचा दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध चीन असा होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ: ओकेडेन एड्डी (कर्णधार), क्रेग टॉम, वेयर कोरी, हार्वी जेक, विखम टॉम, डेवसन मॅट, बेल्टझ जोशुआ, व्हिटॉन जेक, गोवर्स ब्लेक, डोवार्ड टीम, झलोस्की अॅरन (कर्णधार), शॉन मॅथ्यू, ऑग्लीवी फ्लीन, बीली डॅनियल, लॉवेल टायलर (गोलकिपर), मिटन ट्रेंट, वॉदरस्पून डायलन, ब्रॅंड टीम, चार्टर अॅंड्यू (गोलकिपर), हेवर्ड जेरेमी

आयर्लंडचा संघ: हार्टे डेव्हिड (गोलकिपर, कर्णधार), बेल जोनाथन, बेल मॅथ्यू, कार्गो ख्रिस, नेलसन मॅथ्यू, साऊथर्न अॅलन, मॅगी युजीन, शिम्मींन्स कर्क, ओ डोनोग्यु शेन, मुरे सिन, डार्लिंग मिशेल, रॉबसन मिशेल, फिट्झ गेराल्ड डेव्हिड (गोलकिपर), वॉल्श दराघ, ग्लेगहॉर्न पॉल, हार्टे कोनर, डंकन जेरेमी, कोल ली, लॉरे स्टुअर्ट

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: फ्रान्सवर न्यूझीलंड ठरला भारी

टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर

-या कारणामुळे २०१९च्या विश्वचषकाची तिकिटे भारतीयांना मिळणार नाहीत