हॉकी विश्वचषक २०१८: तीन वेळच्या जगज्जेत्या नेदरलँड्सचा पराभव करत जर्मनीने मिळवला सलग दुसरा विजय

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (5 डिसेंबर) झालेल्या सामन्यात जर्मनीने नेदरलॅंड्सवर 4-1 असा विजय मिळवला. हा जर्मनीचा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय ठरल्याने ते ड गटात 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत.

या सामन्यात जर्मनीच्या म्युलर मॅथियस,विंडफेडर लुकास आणि मिल्टकाऊ मार्को यांनी गोल केला. तर नेदरलॅंड्सच्या वेर्गा वॅलेंटाइन याला गोल करण्यात यश आले.

मलेशियावर 7-0 असा मोठा पहिला विजय मिळवत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या नेदरलॅंड्सच्या संघाने आज उत्तम सुरूवात केली. यावेळी वॅलेंटाइनने पहिल्याच सत्राच्या 13व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या सत्रात सावध खेळ करणाऱ्या जर्मनीचे 30व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. त्यांच्याकडून मॅथियसने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

आघाडी घेण्यासाठी तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी बरोबरीचा खेळ केल्याने त्या सत्रात एकालाही गोल करता आला नाही. नेदरलॅंड्सकडून पहिल्या सामन्यात हॅट्ट्रीक करणारा जेरोइन हर्ट्झबेगर मात्र या सामन्यात अपयशी ठरला.

जागतिक क्रमावारीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या जर्मनीने चौथ्या सत्रात त्यांचा खेळ उंचावत दोन गोल करत सामना आपल्या नावे केला. 52व्या मिनिटाला लुकासने पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करत संघाला 2-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच दोन मिनिटांच्या फरकाने मार्कोने त्याच्या या विश्वचषकातील दुसरा गोल करत संघाचा विजय पक्का केला.

या विश्वचषकात आपले स्थान टिकवायचे असेल नेदरलॅंड्सला 9 डिसेंबरचा पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. तसेच जर्मनी मलेशिया विरुद्ध खेळणार असून त्यांचा हा तिसरा सामना जिंकण्याचा निर्धार असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया-भारत: जाणून घ्या, अॅडलेड कसोटीबद्दल सर्वकाही…

असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास…

२०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली अव्वल तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर