हॉकी विश्वचषक २०१८: चीन-आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

भुवनेश्वर। आज (4 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात ब गटातील दुसरा सामना चीन विरुद्ध आयर्लंड असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे.

चीन हा विश्वचषकात पहिल्यांदाच खेळत असला तरी त्यांनी मागील सामन्यात इंग्लंडला 2-2 असे बरोबरीत रोखले होते. तर आयर्लंड संघाला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून 2-1 असा पराभव स्विकारावा लागला होता.

हे दोन्ही संघ विश्वचषकात पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. तसेच 2013पासून या दोन संघामध्ये 2 सामने झाले असून ते दोन्ही सामने आयर्लंडने जिंकले आहेत. या दोन सामन्यांत आयर्लंड संघाने तब्बल 10 गोल केले तर चीनला एकही गोल करता आला नाही.

चीनकडून गुवो झियाओपिंग आणि द्यू तलाके यांना या विश्वचषकात गोल करण्यात यश आले आहे. ते जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असून त्यांनी 7व्या स्थानावरच्या इंग्लंड संघाविरुद्ध सुरेख खेळ केला होता.

चीनला आजच्या सामन्यात चिवट खेळ करण्याची गरज आहे. इंग्लंड विरुद्धचा फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

आयर्लंडला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव पत्करावा लागला तरी त्यांनी आक्रमक खेळ करत शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या ओ डोनोग्यु शेनने ऑस्ट्रेलियाची बचावफळी मोडत संघासाठी पहिला गोल केला होता.

दोन्ही संघाचे बचावफळीचे तंत्र उत्तम असून दोन्ही संघ पहिल्या विजय मिळवण्यासाठी तयार आहेत.

आज होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ:

आयर्लंड: हार्टे डेव्हिड (गोलकिपर, कर्णधार), बेल जोनाथन, बेल मॅथ्यू, कार्गो ख्रिस, नेलसन मॅथ्यू, साऊथर्न अॅलन, मॅगी युजीन, शिम्मींन्स कर्क, ओ डोनोग्यु शेन, मुरे सिन, डार्लिंग मिशेल, रॉबसन मिशेल, फिट्झ गेराल्ड डेव्हिड (गोलकिपर), वॉल्श दराघ, ग्लेगहॉर्न पॉल, हार्टे कोनर, डंकन जेरेमी, कोल ली, लॉरे स्टुअर्ट.

चीन: सू जून, मेंग नान, गुआन क्वांग, गुवो झियाओपिंग, एओ झिवेइ (गोलकिपर), एओ सुझू, इ वेनहुइ, एओ यांग, मेंग दिहावो, सू वेनलिन, सू लिक्सिंग, द्यू चेन (कर्णधार), द्यू तलाके, गुवो झिक्सियांग, इ वेनलाँग, वांग कॅयु (गोलकिपर), एओ वीबाओ, गुवो जीन.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

मेस्सी, रोनाल्डोला मागे टाकत लुका मोड्रिचने पटकावला ‘बॅलोन दी’ओर’ पुरस्कार