हॉकी विश्वचषक २०१८: उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना संघात रंगणार सामना

भुवनेश्वर। 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) अ गटातील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

दोन्ही संघांनी या विश्वचषकात उत्कृष्ठ खेळ करत विजयी सुरूवात केली आहे. न्यूझीलंडने फ्रान्सला 2-1 आणि अर्जेंटिनाने स्पेनला 4-3 असे पराभूत केले आहे.

आज दोन्ही संघ विश्वचषकात सातव्यांदा एकमेंकाविरुद्ध खेळणार आहेत. याआधीच्या 6 पैकी 4 सामने जिंकत अर्जेंटिना आघाडीवर आहे. तर न्यूझीलंडने फक्त एकच सामना जिंकला असून एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

जागतिक क्रमवारीत अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर असला तरी त्यांना स्पेनने चांगलीच टक्कर दिली होती. तर न्यूझीलंडला ही 28 वर्षानंतर प्रथमच खेळणाऱ्या फ्रान्सनेही उत्तम लढा दिला होता.

अर्जेंटिनाच्या मझील्ली ऑग्स्टीन आणि पेईलाट गोंझेलो यांनी स्पेन विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी दोन गोल केले होते. यांना रोखण्याचे आव्हान न्यूझीलंड समोर असणार आहे. तसेच न्यूझीलंडच्या रसल केन आणि स्टीफन जेनेस यांनीही उत्तम खेळ केला असून पहिल्याच सामन्यात प्रत्येकी एक गोल केला आहे.

या विश्वचषकात दोन्ही संघानी त्यांच्या पहिल्याच सामन्यात गोलचा पाऊस पाडला आहे. सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आणि उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि दूरदर्शनवर होणार आहे.

असे आहेत संघ:

न्यूझीलंड- टरंट ब्लेर(कर्णधार),  बेननेट कॉरी, स्टीफन जेनेस, ह्यूगो इंग्लिस, मार्क्यूस चिल्ड्स, एनरसन जॉर्ज (गोलकीपर), जॉयस रिचर्ड (गोलकीपर), लेट डेन, मूइर जॉर्ज, न्यूमॅन डॉमिनिक, अरुण पंचिया, जारेद पंचिया, फिलिप्स हेडन, रॉस निक, रसल केन, सारीकाया एडेन, वूड्स निक, मॅक्लेसे शेआ

अर्जेंटिना- इबारा पेड्रो (कर्णधार), विवाल्दी जुआन (गोलकिपर), पेईलाट गोंझेलो, गिलार्डी जुआन, ऑर्टीज इग्नासिओ, लोपेझ जुआन, पॅरेदेस मॅटीअस, मेनीनी जोक्कीन, विला लुकास, रे मॅटीस, मार्टीनेझ लुकास, मझील्ली ऑग्स्टीन, सीसीलिओ निकोलस, रोस्सी लुकास, बुगाल्लो ऑग्स्टीन, कॅसेल्ला माइका, बेट्टाग्लिओ थॉमस (गोलकिपर), सॅंटीनो थॉमस (गोलकिपर)

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: आज फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात पहिला विजय मिळवण्यासाठी रंगणार चुरस

हॉकी विश्वचषक २०१८: रोमांचकारी झालेल्या सामन्यात भारताला बेल्जियम विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

ISL 2018: फॉर्म गमावलेल्या दिल्लीला मुंबई सिटीवर विजय अनिवार्य