HWL 2017: हॉकी वर्ल्ड लीग फायनलसाठी भुवनेश्वर सज्ज, उद्यापासून स्पर्धेला सुरुवात

0 357

उद्यापासून ओडिशामधील भुवनेश्वर येथे पुरुष हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा कलिंगा स्टेडिअमवर १ डिसेंबर ते १० डिसेंबर पर्यंत खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी भुवनेश्वर शहरात सर्व तयारी करण्यात आली आहे. विमानतळापासून स्टेडियमपर्यंत या स्पर्धेचे बॅनर आणि सहभागी असणाऱ्या संघांच्या देशाचे झेंडे लावण्यात आलेले आहेत. तर स्टेडियमचा संपूर्ण कॅम्पस सजवला आहे आणि मॅस्कॉट (शुभंकर) ऑली हा सर्वांचे स्टेडियममध्ये स्वागत करेल.

कलिंगा स्टेडिअमचे प्रभारी अधिकारी बारिजिया मोहंती म्हणाले, “स्टेडियम स्पर्धेसाठी तयार आहे. आम्ही या स्पर्धेसाठी कॅम्पसमध्ये चांगले ब्रॅण्डिंग केले आहे. रस्त्यांनासुद्धा सजवण्यात आले आहे. तसेच रोषणाईची करण्यात आली आहे. तर सगळीकडे स्वच्छता करण्यात आली आहे. सामन्याआधी खेळाडू दोनीही टर्फ वापरू शकतात.”

त्याचबरोबर इस्ट कोस्ट रेल्वेचे प्रशिक्षक रंजन दास म्हणाले “या स्पर्धेमुळे आमच्या खेळाडूंना परदेशी खेळाडूंना जवळून बघता येईल. तसेच त्यांच्या फिटनेसबद्दल आणि कौशल्याबद्दल आणखी गोष्टी जाणून घेता येतील.”

या स्पर्धेसाठी विशेष बसची सुविधा करण्यात आली आहे. ज्यावर या स्पर्धेचा लोगो, झेंडे आणि मॅस्कॉट रंगवले आहेत. तरुण हॉकी खेळाडू या स्पर्धेचे स्वयंसेवक म्हणून काम करतील.

Comments
Loading...
%d bloggers like this: