अजिंक्य रहाणेवर टीका करणाऱ्यांनी त्याची आधी ही परदेशातील आकडेवारी नक्की पहावी

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाला विदेशी भुमीत विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यातच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशातील मैदानावर विजय मिळवणे अवघड आहे.

जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला होता. पण भारताला या मालिकेत 2-1 असा पराभव स्विकारावा लागला होता. तर इंग्लंडमध्ये आॅगस्ट महिन्यात झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ब्रिस्बेन येथे झालेला तिसरा कसोटी सामना जिंकला होता.

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवत चांगली सुरूवात केली आहे. हा विजयी फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न भारत करेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात 71 धावा केल्या. त्याच्या बरोबरच अजिंक्य रहाणनेही 70 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या भक्कम केली. त्याची ही खेळी भारताला उपयोगी ठरली.

वाचा- या कारणामुळे चेतेश्वर पुजारा आहे टीम इंडियासाठी लकी

यापुर्वीही रहाणेने ऑस्ट्रेलिया विरुद्धच नाही तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धही उत्तम खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली होती.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध जोहान्सबर्ग येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेने 48 धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने 63 धावांनी जिंकला होता. तर नॉटींगघम तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला 203 धावांनी पराभूत केले होते. यामध्ये रहाणेने 81 धावांची खेळी केली होती.

विदेशी भुमीत रहाणेने आजपर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. मायभूमीत शतक करण्याआधी त्याने बाहेरील मैदानावर पाच शतके ठोकली आहेत. म्हणून पुजारा बरोबरच रहाणेही भारतीय संघासाठी महत्त्वाचा भाग बनला आहे.

2018मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे कसोटी सामने जिंकणारा भारतीय पहिला संघ ठरला आहे. या तीन्ही विजयात रहाणेने चमकदार कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. यात पुन्हा एकदा रहाणेनेच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

सामना संपल्यावर टीम इंडियातील या दोन खेळाडूंना ३० मिनीटांनीच सुरु केला सराव

५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय