कुंबळे अझरूद्दिनचा चाहता तर त्याची बायको धोनीची चाहती

भारतीय संघाकडून कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा महान गोलंदाज अनिल कुंबळे आता क्रिकेट मधील एक विचारवंत म्हणून पुढे आला आहे. कुंबळेला दोन दशकांइतका क्रिकेटचा अनुभव आहे.

त्याने विवीध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले आहे. त्याला तुझा सगळ्यात आवडता कर्णधार कोणता असा प्रश्न विचारला होता तर त्याने दिलेल्या उत्तराने अनेकांना आश्चर्य  वाटले आहे.

लेग स्पिनर कुंबळेने मोहम्मद अझरूद्दिन हा आपला सगळ्यात आवडता कर्णधार असल्याचे म्हटले आहे. कुंबळेने 1990 मध्ये अजहरच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

अजहरने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकपणा आणला होता. त्याने 47 कसोटी आणि 174 वन-डे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

कुंबळेची बायको मात्र धोनीची मोठी चाहती-

एका बाजुला अनिल कुंबळे अझरूद्दिनचा चाहता तर त्याची महेंद्रसिंग धोनीची चाहती आहे. ”जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती धोनी सोबत सेल्फी घेत असते”. असे अनिल कुंबळेने स्पोर्टस स्टारशी बोलताना सांगितले.

कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. एकाच डावात 10 विकेट घेण्याचा भीम पराक्रम त्याने आपले नावे केला आहे.

महत्वाच्या बातम्या-