संपूर्ण वेळापत्रक: पुण्यात होणार रणजी ट्रॉफीचे हे सामने

पुणे । केवळ दोन आठवडे राहिले असताना भारतीय क्रिकेट बोर्डाने रणजी ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केली आहे. २०१७-१८ या रणजी ट्रॉफीच्या मोसमात २८ संघ भाग घेत असून त्यांचे ४ गटात करण्यात आले आहे. ९१ सामने यावेळी या स्पर्धेत होणार आहे.

प्रत्येक गटातून २ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. ही स्पर्धा ६ ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून अंतिम सामना २९ डिसेंबर रोजी होणार आहे.

१९३४ सालापासून ही स्पर्धा खेळवली जात असून मुंबई रणजी संघाने विक्रमी ४१ वेळा हे स्पर्धा जिंकली आहे. हे स्पर्धेचे ८४ वर्ष असून मुंबई रणजी संघाकडून पुन्हा एकदा मोठ्या आशा आहेत. गेल्या वेळी त्रयस्थ ठिकाणी झालेल्या सामान्यांमुळे प्रेक्षकांनी स्पर्धेकडे पाठ फिरवली. त्याचमुळे यावेळी ही स्पर्धा होम आणि अवे अशा प्रकारात खेळवली जाणार आहे.

यावेळी महाराष्ट्रातील तीनही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यात महाराष्ट्र अ गटात, मुंबई क गटात तर विदर्भ ड गटात आहे. महाराष्ट्र रणजी संघाचे होम ग्राउंड पुण्यातील एमसीए स्टेडियम, गहुंजे आहे. महाराष्ट्रात एकूण ९ सामने होणार असून त्यात पुणे, नागपूर आणि मुंबई येथे प्रत्येकी ३ सामने होणार आहे. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीची ठिकाणे अजून घोषित झालेली नाहीत.

२०१७-१८ मोसमासाठी रणजी करंडक स्पर्धेची गटवारी –
अ गट – कर्नाटक, दिल्ली, आसामा, महाराष्ट्र, हैदराबाद, उत्तर प्रदेश, रेल्वे
ब गट – झारखंड, गुजरात, केरळ, सौराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर
क गट – मुंबई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीशा, बडोदा, त्रिपुरा
ड गट – हिमाचल प्रदेश, विदर्भ, पंजाब, बंगाल, सेनादल, गोवा, छत्तीसगड

यावर्षी पुण्यात होणारे सामने
१ नोव्हेंबर-४ नोव्हेंबर, महाराष्ट्र वि. कर्नाटक
९ नोव्हेंबर-१२नोव्हेंबर, महाराष्ट्र वि रेल्वे
२५नोव्हेंबर- २८नोव्हेंबर, महाराष्ट्र विरुद्ध आसाम

यावर्षी मुंबईत होणारे सामने
२४ ऑक्टोबर-२७ ऑक्टोबर, मुंबई वि. तामिळनाडू
९ नोव्हेंबर-१२नोव्हेंबर, मुंबई वि बडोदा
२५नोव्हेंबर- २८नोव्हेंबर, मुंबई वि त्रिपुरा

यावर्षी नागपूरात होणारे सामने
२४ ऑक्टोबर-२७ ऑक्टोबर, विदर्भ वि छत्तीसगढ
१ नोव्हेंबर-४ नोव्हेंबर, विदर्भ वि सर्विसेस
२५नोव्हेंबर- २८नोव्हेंबर, विदर्भ विरुद्ध हिमाचल प्रदेश