शरद पवार यांचा मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून सत्कार

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा २४ मे रोजी सत्कार करण्यात आला. देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शरद पवार यांना ह्या वर्षी केंद्र सरकारने सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा हा सत्कार एमसीए लॉन्ज, वानखेडे स्टेडियम चर्चगेट येथे करण्यात आला होता.

यावेळी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर, सुनील गावसकर, माजी कर्णधार अजित वाडेकर हे उपस्थित होते.

शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोशिएशनचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.