हाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूची विजयी सलामी

सध्या सुरु असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. तिने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हाँग काँगच्याच यौत इ लेऊंगला पराभूत केले.

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधू आणि १७ वर्षीय यौत इ लेऊंगमध्ये २३ मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये सिंधूला लेऊंगने चांगली लढत दिली होती. परंतु सिंधूने आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सेट २१-१८ अश्या फरकाने जिंकून सामन्यात आघाडी मिळवली.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने लेऊंगला कोणतीही संधी न देता सेट २१-१० अश्या फरकाने जिंकून सामनाही जिंकला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सिंधूने आता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.