एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी शिक्षणाचा त्याग केल्याचे बऱ्याचदा ऐकण्यात आले आहे. पण शिक्षणासाठी आणि लहानपणी पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय हा दुर्मिळच. पण असाच एक निर्णय हाँग काँगचा यष्टीरक्षक फलंदाज ख्रिय कार्टरने घेतला आहे.

21 वर्षीय कार्टरचा जन्म हाँग काँगमध्ये झाला असला तरी तो लहानाचा मोठा आॅस्ट्रेलियातील पर्थमध्ये शहरात झाला. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याचे शिक्षण हाँग काँगकडून क्रिकेट खेळण्यासाठी थांबवले होते.

त्याने हाँग काँगकडून 11 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत 5 प्रथम श्रेणी आणि 17 अ दर्जाचे क्रिकेट सामने खेळले आहेत. तो 2014 पासून हाँग काँग संघाचा नियमित सदस्य होता.

पण आता तो त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अॅडलेडला परतणार आहे. तेथे तो कॅथे पॅसिफिकसह सहाय्यक पायलट बनण्यासाठी 55 आठवड्यांचे प्रशिक्षण घेणार आहे.

याबद्दल कार्टर म्हणाला, “मी आधीच माझे शिक्षण थांबवले होते. पण मला वाटते आता मला जी गोष्ट करायची होती ती गोष्ट करण्याची ही वेळ आहे. ती गोष्ट म्हणजे पायलट बनणे.”

कार्टरने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2018 स्पर्धेत खेळला आहे. पण याबरोबरच तो पुन्हा हाँग कागकडून भविष्यात पुनरागमन करु शकतो.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका

माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग