लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हुड, दक्ष पाटील, अमोघ दामले यांची विजयी सलामी

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज २०१८ स्पर्धेत नमिश हुड, दक्ष पाटील , आर्यन किर्तने , विरेन चौधरी, रित्सा कोंडकर, दिया बोरुंद्या, अमोघ दामले , तेज ओक  व सुर्या काकडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासुन सुरू झालेल्या या स्पर्धेत ८ वर्षाखालील मिश्र गटात विरेन चौधरीने  प्रजीत रेड्डीचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. नमिश हुडने सुजय देशमुख याचा तर  आर्यन किर्तने याने निरज जोरवेकरचा 6-2 असा सहज पराभव केला.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात अमोघ दामले याने कार्तिक शेवाळेचा  6-2 असा तर तेज ओकने शार्दुल खवळेचा 6-1 असा सहज पराभव केला. सुर्या काकडेने शिवांश कुमारचा 6-4 असा पराभव करत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: ८ वर्षाखालील मिश्र गट: पहिली फेरी:  
नमिश हुड वि.वि सुजय देशमुख 6-2
दक्ष पाटील वि.वि अगस्त्य भामिडीपाती 6-1
आर्यन किर्तने वि.वि निरज जोरवेकर 6-2
विरेन चौधरी वि.वि प्रजीत रेड्डी 6-0
रित्सा कोंडकर वि.वि मेहक कपुर 6-3
दिया बोरुंद्या वि.वि विरा हरपुडे 6-2
10 वर्षाखालील मुले
अमोघ दामले वि.वि कार्तिक शेवाळे 6-2
तेज ओक वि.वि शार्दुल खवळे 6-1
सुर्या काकडे वि.वि शिवांश कुमार 6-4