पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत अभिषेक शिंदे, श्रेया पुरंदरे पुनावाला ट्रॉफीचे मानकरी

पुणे । दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित पूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत अभिषेक शिंदे आणि श्रेया पुरंदरे हे पूनावाला ट्रॉफीचे मानकरी ठरले.

पुणे, पिंपरी-चिंचवड येथून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी जिलेबी रेस, टेंट पेगिंग आणि फायर जम्पची श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंड येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेतून यावर्षी आॅगस्टमध्ये बँगलोर येथे होणाºया इक्वेस्ट्रीअन प्रिमीअर लीग या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, पुणे शहर भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे चिटणीस रवींद्र उपाध्ये, श्रीनिवास विरकर, प्रदीप कुरुलकर, गुणेश पुरंदरे उपस्थित होते.

ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष आहे.

जिलेबी रेस स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात पूर्वा शितोळे, विश्वजीत मुंगसे यांनी सुवर्ण, सिद्धार्थ पंडित, विहान काळोखे यांनी रौप्य, चित्रा भोकरे, समृद्धी मुंगसे यांनी कांस्य पदकाची कमाई केली.

शो जम्पिंग मध्ये खुल्या गटात अभिषेक शिंदे याने सुवर्ण, श्रेया पुरंदरे हिने रौप्य तर युवा गटात सुरज जगताप याने सुवर्ण अभिषेक शिंदे रौप्य आणि काजल बोरसे हिने कांस्यपदकाची कमाई केली.

शो जम्पिंग बिगीनर गटात रोहीत आहिर, काजल बोरसे आणि अभिषेक शिंदे यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.

तर खुल्या गटात सागर गामा, श्रेया पुरंदरे आणि गौतम लेले, आणि युवा गटात श्रेया पुरंदरे, अभिषेक शिंदे आणि अनिरुद्ध मोहिरे यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकाविले.