भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेत 25 सप्टेंबरला भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेला हा सामना बरोबरीत सुटला.

हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे मात्र स्टेडियममध्ये हा सामना पहायला गेलेल्या एका भारतीय संघाच्या छोट्या चाहत्याला रडू कोसळले. यावेळी त्या मुलाच्या वडिलांनी त्याला समाजावण्याचा प्रयत्न केले. या मुलाच्या निरागसपणाचे अनेकांनी सोशल मिडियावर कौतुकही केले आहे.

या मुलाला सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्यामुलाला फोन करुन त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. याबाबतीत त्या लहान मुलाच्या वडिल अमनप्रीत सिंग यांनी ट्विटरवरुन माहिती दिली.

त्यांनी ट्विट केले आहे की “तो(लहान मुलगा) आता आनंदी आहे आणि आम्ही अंतिम सामनाही पाहणार आहोत. खरचं भुवनेश्वर कुमार दयाळू आहे. त्याने त्याला फोन करुन उत्साह दिला.”

त्याचबरोबर या लहान मुलाबाबत भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही ‘काही नाही अंतिम सामना आपणच जिंकू’ अशा आशयाचे ट्विट केले आहे.

एवढेच नाही तर त्या लहान मुलासोबत अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशीद खान आणि मोहम्मद शेहजादने सेल्फीही काढले आहेत.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 252 धावा करत 253 धावांते लक्ष्य भारतीय संघापुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकात सर्वबाद 252 च धावा करता आल्या.

भारत एशिया कप 2018 च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी, 28 सप्टेंबरला पार पडेल.

महत्त्वाच्या बातम्या-

टॉप ५: भारत-अफगाणिस्तानच्या सामन्यात झाले हे खास विक्रम

महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात

Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो