1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल

क्रिकेट चाहात्यांसाठी 1998 च वर्ष लक्षात राहतं ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने शारजात ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेल्या शतकी खेळींमुळे. आजही त्याच्या खेळींच्या आठवणी रंगून सांगितल्या जातात. 

त्याच्या या खेळींमुळे आणि शारजात झालेल्या ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील तिरंगी वनडे मालिकेमुळे  आयसीसीच्या  वनडे क्रमवारीत अनेक बदल झाले होते.

त्यावेळी आयसीसीच्या वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत अनेक दिग्गज खेळाडू होते.ज्यांचा खेळ बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असायची. 

या क्रमवारीत ब्रायन लारा, मायकेल बेवन, गॅरी कस्टर्न, सचिन तेंडूलकर असे खेळाडू होते. 

1998 च्या शारजातील मालिकेपूर्वी अशी होती आयसीसीवनडे क्रमवारी:

1. ब्रायन लारा(विंडीज) –  892 गुण

2. मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) – 852 गुण

3. गॅरी कस्टर्न (दक्षिण अफ्रिका) -816 गुण

4. सनथ जयसुर्या (श्रीलंका) – 799 गुण

5. मार्क वॉ  (ऑस्ट्रेलिया) – 787 गुण

6. सचिन तेंडूलकर (भारत) – 785 गुण

7. अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) – 778 गुण

8. मोहम्मद अझरूद्दीन  (भारत) – 770 गुण

9. सईद अन्वर (पाकिस्थान) – 768 गुण

10. हँसी क्रोनिए (दक्षिण अफ्रिका) – 766 गुण

या मालिकेत सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध शारजात 22 एप्रिल आणि 24 एप्रिल 1998ला अनुक्रमे 143 आणि 134 धावा अशी लागोपाठ दोन शतके केली होती.  ही शतके त्याने तीन दिवसांच्या आत केली होती. 

त्याच्या 143 धावांच्या शतकामुळे भारताला तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला होता.  तर अंतिम सामन्यात त्याच्या 134 धावांमुळे  भारताने प्रसिद्ध असणारा विजय मिळाला होता. 

या खेळींनी सचिनने 1998 च्या वर्षाची धमाकेदार सुरूवात केली होती. या वर्षात त्याने वनडे क्रिकेटमध्ये  65.31 च्या सरासरीने 1894 धावा केल्या होत्या. 

तर या वर्षानंनतर ऑस्ट्रेलियाने  1999, 2003 आणि 2007 असे सलग तीन वर्ष विश्वचषक विजेतेपद मिळवले होते. 

शारजातील मालिकेनंतर  आयसीसी वनडे क्रमवारीत सचिनने तब्बल 61 गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले होते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचबरोबर मार्क वॉ, गॅरी कस्टर्न यांचे स्थान मात्र घसरले होते. 

सौरव गांगुलीने त्याचे गुण गमावुनही पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले होते. तर मोहम्मद अझरूद्दीनला पहिल्या दहा फलंदाजांमधुन बाहेर पडावे लागले होते. 

ब्रायन लारा, मायकेल बेवन हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम राहीले होते. 

1998 च्या शारजातील मालिकेनंतर अशी होती आयसीसीवनडे क्रमवारी

1. ब्रायन लारा(विंडीज) –  892 गुण

2. मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) – 872 गुण

3. सचिन तेंडूलकर (भारत) – 846 गुण

4.गॅरी कस्टर्न (दक्षिण अफ्रिका) -813 गुण

5.सनथ जयसुर्या (श्रीलंका) – 791 गुण

6. मार्क वॉ  (ऑस्ट्रेलिया) – 774 गुण

7. हँसी क्रोनिए (दक्षिण अफ्रिका) – 766 गुण

8. अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) – 766 गुण

9. सईद अन्वर (पाकिस्थान) – 765 गुण

10. सौरव गांगुली (भारत) – 749 गुण 

 

महत्त्वाच्या बातम्या –

महाराष्ट्राची स्म्रिती मानधना आशिया कपसाठी भारताची उपकर्णधार तर मुंबईकर जेमिमाचाही संघात समावेश

मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?

दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक

मुंबईकर पृथ्वी शाॅ ठरला ११ मोसमातील अनेक खेळाडूंना सरस

IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा