हे माहित आहे का? किती संघ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशात कसोटी जिंकले आहेत?

जगात क्रिकेट हा खेळ दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. गेल्याच महिन्यात अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा देण्यात आला आहे.

परंतु आपणास हे माहित आहे की किती कसोटी खेळणारे देश बाकी कसोटी खेळणाऱ्या देशात कसोटी सामना जिंकले आहेत? तर केवळ पाच देश आहेत ज्यांनी कसोटी खेळणाऱ्या सर्व देशात एकतरी कसोटी सामना जिंकला आहे. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्युझीलँड, पाकिस्तान आणि भारत या देशांचा समावेश आहे.

ऐकून आपण आश्चर्य चकित व्हाल परंतु इंग्लंड झिम्बाब्वेमध्ये कधीही कसोटी सामना जिंकले नाही. एकवेळचा दिग्गजांचा संघ असणारा वेस्ट इंडिज श्रीलंकेत तर श्रीलंका भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी सामना जिंकलेली नाही. तर बांगलादेश आणि झिम्बाब्वे अनेक देशात एकही कसोटी सामना जिंकले नाहीत.