सिंधू म्हणते, सेहवाग सर तुमच्या यॉर्करने मी ‘क्लीन बोल्ड’

पी व्ही सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहरा हिचा पराभव करत कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकली आहे. कोरिया ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा अंतिम सामना सिंधूने २२-२०, ११-२१, २१-१८ असा जिंकत सुवर्ण पदक पटकावले आहे.

यामुळे साहजिकच सिंधूवर अनेक दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात समालोचन करत असलेला सेहवागही सिंधूला शुभेच्छा द्यायला विसरला नाही. त्याने सामना झाल्यावर काही मिनिटातच सिंधूला शुभेच्छा दिल्या.

सेहवागने आपल्या शुभेच्छामध्ये म्हटले, ” २२ वर्षीय पीव्ही सिंधू महान खेळाडू आहे. जबदस्त खेळाडू ! अंतिम सामना जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. ”

यावर सिंधुनेही खास उत्तर देताना सेहवागचे आभार मानले. सिंधू म्हणते, ” सेहवाग सर मी तुमच्या यॉर्करने बोल्ड झाली आहे. मी माझ्या कारकिर्दीत परिपूर्ण खेळाडू बनण्याचा प्रयत्न करेल. ”

 

दाकदाचित आपणास माहिती नसेल तर –
#१ पीव्ही सिंधूला जागतिक चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत नोजोमी ओकुहरा हिने पराभूत केले होते . त्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

#२ कोरिया ओपन सुपर सिरीज जिकंत सिंधूने इतिहास रचला आहे. कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

#३ जागतिक मानांकन यादीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूचे हे तिसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे. तर २०१७ सालातील भारतीयाने जिंकेलेले ५वे सुपर सिरीजचे विजेतेपद आहे.

#४ जागतिक मानांकन यादीत नोजोमी ओकुहरा नवव्या स्थानावर आहे. सिंधू आणि ओकुहराया दोन खेळाडूंमध्ये या सामन्याअगोदर ७ सामने झाले होते. त्यात ४ सामने ओकुहराने जिंकले होते तर ३ सामने सिंधूने जिंकले होते. या सामन्यातील विजयासह दोन्ही खेळाडूंनी आता प्रत्येकी ४-४ सामने जिंकले आहेत.

#५ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट जिंकल्यानंतर ओकुहराने सिंधूला नमवले होते. परंतु या सामन्यात सिंधूने त्याची पुनरावृत्ती करण्यापासून ओकुहराला रोखले.

#६ या स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व सामन्यांपासून सर्व सामने जिंकण्यासाठी तीन सेट खेळावे लागले आहेत.