पहा: श्रीलंकेतील पहिल्या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी अशी घेतली सुट्टीची मजा !

डांबूला: येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ९ धावांनी विजय मिळवला. यात शिखर धवन आणि विराट कोहली यांनी चांगली खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. नाबाद शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीर घोषित करण्यात आले. या विजयानंतर भारतीय संघाने जंगल सफारी किंवा श्रीलंकेतील निसर्गात फिरण्याचा आनंद घेतला.

शतकवीर शिखर धवनने निसर्गात जाणं आणि फिरणं पसंद केलं.

अजिंक्य रहाणेने स्विमिंग पूलमधील एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

कुलदीप यादवने स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला तसेच विश्रांतीला प्राधान्य दिल.

कर्णधार विराट कोहलीने तो जाहिरात करत असलेल्या स्पिकर्सची जाहिरात ट्विटरवरून करण्याला प्राधान्य दिलं तसेच वनडे मालिकेपूर्वीचा एक खास फोटोही शेअर केला.


हार्दिक पंड्याने विश्रांती घेत असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.

सलामीवीर रोहित शर्माने आपल्या पत्नीबरोबरचा हॉटेलमधील एक विडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

Never dull with her around 😆

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

उमेश यादवने एका कुत्राबद्दल प्रेम व्यक्त करणारा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

# home#pet#unconditionallove#dodo😗

A post shared by Umesh Yadav (@umeshyaadav) on