एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही…

शनिवार (15 सप्टेंबर) पासून 14 व्या एशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे.

या स्पर्धेत यावर्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या सहा संघात विजेतेपद जिंकण्यासाठी चूरस रंगेल. यातील हाँगकाँग हा संघ एशिया कपची पात्रता फेरी जिंकून मुख्य स्पर्धेत दाखल झाला आहे, तर अन्य संघ मुख्य स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत.

असे आहेत साखळी फेरीतील संघाचे गट-

अ गट- भारत, पाकिस्तान आणि हाँग काँग

ब गट – श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान

अशी आहे एशिया कप 2018 च्या स्पर्धेची रचना-

या स्पर्धेत एकूण 12 संघ खेळणार आहेत. हे सामने दुबई आणि अबुधाबीमध्ये होतील. तर 28 सप्टेंबरला अंतिम सामना पार पडेल.

या स्पर्धेची सुरुवात साखळी फेरीपासून होणार आहेत. या फेरीसाठी सहा संघाची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यात प्रत्यक गटातून तीन संघ खेळतील. यातील दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ पुढच्या फेरीसाठी(सुपर फोर) पात्र ठरतील.

हे चारही संघ सुपर फोरमध्ये एकमेकांची प्रत्येकी एक सामना खेळतील. त्यानंतर सर्वाधिक गुण मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

या दोन संघात 28 सप्टेंबरला दुबईमध्ये अंतिम सामना पार पडेल.

या ठिकाणांवर होणार सामने-

या स्पर्धेत 15 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान होणारे सामने हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई आणि झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी येथे होणार आहेत.

या गोष्टींकडे असेल लक्ष-

या वर्षीच्या एशिया कप स्पर्धेच्या मुख्य आकर्षणापैकी भारत-पाकिस्तान हा सामना आहे. तसेच या संघाच्या बरोबर एकाच गटात असलेल्या हाँगकाँगच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. कारण हाँग काँगला आयसीसीच्या वनडे क्रिकेटचा दर्जा नाही.

परंतू तरीही आयसीसीच्या नवीन नियमानुसार या स्पर्धेतील त्यांचे सामने अधिकृत वनडे सामन्यांमध्ये गणले जाणार आहेत.

त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघात त्यांचा अनुभवी गोलंदाज लसिथ मंलिगाचे पुनरागमन झाले आहे. त्याने एशियन गेम्समध्ये आत्तापर्यंत तीन वेळा एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. असे करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

तसेच अफगाणिस्तानच्या फिरकी आक्रमनाकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. तर बांगलादेश संघात मुस्तफिजूर रेहमानच्या कामगिरीकडे लक्ष असेल. त्यामुळे बांगलादेशचा फिझ फॅक्टर महत्त्वाचा ठरु शकतो.

असे आहेत एशिया कप 2018 चे संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल.

पाकिस्तान: सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शान मसूद, शोएब मलिक, हरीस सोहेल, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान खान, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.

हाँग काँग: अंशुमन रथ (कर्णधार), आयझ खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकअल्सन, क्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाज, अरशद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, निजाकत खान, राघ कपूर, स्कॉट मॅकेकनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, आफताब हुसेन.

श्रीलंका: अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, कुसल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दानुश्का गुनथिलका, थिसरा परेरा, दसुन शनका, धनंजय डि सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवन परेरा, अमिला अपोन्सो, कसून रजीथा, सुरंगा सकमल, दुश्मंथा चमिरा, लसिथ मलिंगा.

बांगलादेश: मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार), शाकिब अल हसन, तमीम इक्बाल,  मोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकुर रहिम, अरिफुल हक, महमदुल्ला, मोसद्दीक हुसेन, मेहदी हसन, नाझमुल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान, अबू हैदर रोनी, नाझमुल हुसेन शान्तो, मोमिनुल हक.

अफगाणिस्तान: असघर अफगाण (कर्णधार), मोहम्मद शहझाद, इहसानुल्लाह जनत, जावेद अहमदी, रेहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बादिन नायाब, रशीद खान, नजीबुल्लाह झादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, सामीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद शिरझाद, शारफुद्दीन अशरफ, यमीन अहमदझाई.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: एमएस धोनीच्या नावावर आहे हा खास विक्रम

दोन वर्षानंतर पुन्हा धडाडणार स्टेनगन

म्हणून एमएस धोनीने सोडले कर्णधारपद