तेव्हा विराट म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा !

0 851

२०१४मध्ये जेव्हा विराट कोहलीकडे भारतीय कसोटी संघाची धुरा आली तेव्हा त्याने संघाला दिलेला संदेश काल एका खाजगी कार्यक्रमात शेअर केला. विराट तेव्हा माजी कर्णधार एमएस धोनीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करत होता.

ही गोष्ट आहे २०१४मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्याची. पहिल्या कसोटीत एमएस धोनी दुखापतग्रस्त असल्यामुळे विराटने नेतृत्व केले होते. चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ ५ बाद २९० वर खेळत होता. त्या रात्री विराटने संघ सहकारण्यांना आपण हा सामना फक्त जिंकण्यासाठी खेळत आहोत असे प्रेरित केले होते.

” ऑस्ट्रेलिया संघाने आपल्याला कोणतेही लक्ष दिले तरी आपल्याला ते पार करायचे आहे. जर कुणाला यात काही शंका असेल किंवा आपल्याला अशी रणनीती नको असेल तर मला आताच सांगा. आणि जर तस काही नसेल तर सांगेल आपल्या रूममध्ये परत जा आणि उद्या आपण भेटू तेव्हा हा उद्देश घेऊनच भेटू. ” असे विराटने तेव्हा संघ सहकारण्यांना म्हणाला होता.

“त्यामुळे या पराभव जिव्हारी लागला होता. परंतु त्यामुळे आम्हाला एक चांगली प्रेरणा मिळाली. त्यामुळे आम्ही जगात कुठेही जिंकू शकतो हा आत्मविश्वास मिळाला होता. ” असे विराट सीएनएन वाहिनीने आयोजित केलेल्या गौरव समारंभात म्हणाला.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३६३ धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु भारतीय संघ ८७.१ षटकांत ३१५ धावांवर सर्वबाद झाला होता. विराटने चौथ्या डावात १४१ तर मुरली विजयने ९९ धावा केल्या होत्या.

ह्याच सामान्यामुळे विराटकडे खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताने लक्ष द्यायला सुरुवात केली. या खेळीबद्दल बोलताना विराट म्हणतो, ” खूप खेळी आहेत ज्या खरंच चांगल्या आहेत परंतु ऍडलेडमधील १४१ धावांच्या खेळीमुळे आम्ही विजयाच्या जवळ पोहचलो होतो. “

तेव्हाच्या कसोटी सामन्यातील धावफलक

पहिली कसोटी, बॉर्डर गावसकर ट्रॉफी- ९ ते ४ डिसेंबर २०१४
ऑस्ट्रेलिया
517/7d & 290/5d
भारत

444 & 315 (87.1 ov)
ऑस्ट्रेलिया संघाने ४८ धावांनी विजय मिळवला.

Comments
Loading...
%d bloggers like this: