विम्बल्डन: गार्बिन मुगुरझाचे पहिले वाहिले विम्बल्डन विजेतेपद

गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

यापूर्वी मुगुरुझाने २०१६ साली साली फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते. १ तास आणि १७ मिनिट चाललेल्या या सामन्यात मुगुरुझाने पाच वेळा विम्बल्डन विजेत्या व्हीनसचा दणदणीत पराभव केला.

२०१५ साली यापूर्वी मुगुरुझा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली होती. त्यावेळी तिला व्हीनसची बहीण असणाऱ्या सेरेनाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मुगुरुझाने सेरेना विलियम्स आणि व्हीनस विलियम्स या दोनही बहिणींना अनुक्रमे फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत पराभूत करून ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे.

विलियम्स भगिनींना ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पराभूत करणारी मुगुरुझा ही पहिली खेळाडू ठरली आहे. जेव्हा व्हीनस २००० मध्ये पाहिलं ग्रँडस्लॅम जिकली होती तेव्हा मुगुरुझा केवळ ६ वर्षांची होती.

मुगुरुझा ही केवळ दुसरी स्पॅनिश खेळाडू आहे जिने विम्बल्डन महिला एकेरीवर नाव कोरले आहे. यापूर्वी केवळ ३ स्पॅनिश खेळाडूंना ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकता आली आहेत.