‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’: अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे बांगलादेशला आव्हान

साउथँम्पटन। आज(24 जून) 2019 आयसीसी विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात होणार आहे. हा सामना द रोज बॉल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातून या विश्वचषकातील पहिला विजय मिळवण्यास अफगाणिस्तानचा संघ उत्सुक आहे; तर बांगलादेश त्यांचे स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या इराद्याने हा सामना खेळण्यासाठी उतरतील.

या सामन्याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नाईबने बांगलादेश संघाला आव्हान दिले आहे. त्याने म्हटले आहे की ‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे (आम्ही तर आधीच डुबलो आहोत, पण आता आम्ही तूम्हाला पण घेऊन डुबणार)’

अफगाणिस्तानने आत्तापर्यंत या विश्वचषकात 6 सामने खेळले आहेत. यातील एकाही सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

तसेच बांगलादेशने आत्तापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी दोन  सामन्यात विजय मिळवले आहेत. तसेच 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे अजून ते या विश्वचषकातील उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी शर्यतीत कायम आहेत.

अफगाणिस्तानचा या सामन्याआधी शनिवारी भारताविरुद्ध सामना झाला होता. या सामन्यात त्यांनी भारताला कडवी लढत दिली होती. पण या सामन्यात ते केवळ 11 धावांनी विजयापासून दूर राहिले. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठ्या धावा करण्यापासून रोखले होते.

याबद्दल बोलताना नाईब म्हणाला, ‘तूम्ही भारताविरुद्ध पाहिले. भारताकडे चांगली फलंदाजांची फळी आहे. त्यामुळे जर खेळपट्टी आमच्या फिरकीपटूंना मदत करत असेल, तर कदाचीत फक्त बांगलादेशसाठी नाही तर सर्वांसाठी त्यांना खेळणे कठीण जाईल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हॅट्रिक बॉलच्या आधी धोनीने दिला होता हा सल्ला, शमीने केला खुलासा

२०१९ विश्वचषकात खेळाडूंचे झाले नाही एवढे होतेय या व्यक्तीचे कौतुक

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत केन विलियम्सनने केली रोहित-धवनच्या विक्रमाची बरोबरी