धोनी एवढ क्रिकेट खेळला, परंतु हा विक्रम कधी करताच आला नाही

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांचा घोषित केला आहे.

या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने हे शतक 137 चेंडूत पूर्ण केले. त्याने त्याचे पहिले शतक इंग्लंडमध्ये द ओव्हल मैदानावर केले होते.

त्यामुळे तो आशिया खंडाबाहेर दोन कसोटी शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. तसेच भारतीय यष्टीरक्षकाने आशिया खंडाबाहेर कसोटीमध्ये शतक करण्याची ही पाचवी वेळ आहे.

याआधी विजय मांजरेकर, अजय रात्रा आणि वृद्धिमान सहा या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांनी आशिया खंडाबाहेर प्रत्येकी एक शतक केले आहे. विशेष म्हणेज या तिघांनीही विंडीज विरुद्धच ही कसोटी शतके केली आहेत.

त्यामुळे पंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.

कसोटीमध्ये आशिया खंडाबाहेर शतके करणारे भारतीय यष्टीरक्षक – 

118 – विजय मांजरेकर (विरुद्ध विंडीज, 1959)

115* – अजय रात्रा (विरुद्ध विंडीज, 2002)

104 – वृद्धिमान सहा (विरुद्ध विंडीज, 2016)

114 – रिषभ पंत (विरुद्ध इंग्लंड, 2018)

159* – रिषभ पंत (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2019)

महत्त्वाच्या बातम्या:

का होतेय सध्या रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची तुलना

जे ना जमले कुणाला, ते जमले रिषभ पंतला

कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा पुजारा ठरला आठवा भारतीय