नेमारची लोकप्रियता पीएसजी पेक्षाही अधिक ?

लोकप्रियता, प्रसिद्धी आणि नेमार हे मागील काही वर्षांपासून समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. नेमारने जेव्हापासून व्यावसायीक फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली तेव्हापासून तो या क्षेत्रातील खूप मोठा ब्रँड बनलेला आहे. नुकताच त्याने पॅरिस सेंट जर्मेन संघासोबत विक्रमी करार केला. त्याला या करारामुळे मिळणारे मानधन हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

नेमार पॅरिसच्या संघासोबत जोडला गेला आणि अनेक चर्चांना पेव फुटले. आपल्याकडे जसे मधल्या काळात सिम कार्ड घेण्यासाठी रांगा लावण्यात आल्या तश्या रांगा पॅरिस सेंट जर्मनच्या स्टोर बाहेर नेमार नावाची पॅरिस संघाची जर्सी विकत घेण्यासाठी लागल्या आहेत. नेमारच्या जेर्सीची किंमत तब्बल ११२ पाउंड म्हणजेच ९५०० रुपये इतकी आहे. नेमारच्या जर १० लाख जर्सी विकल्या गेल्या तर पीएसजी संघाला त्यांचे पैसे परत मिळतील असेही स्त्रोतांचे म्हणणे आहे.

नेमारच्या जर्सीचे अनावरण आणि नेमारला पॅरिस समर्थकांच्या समोर ओळखीसाठी जेव्हा आणले गेले तेव्हा पूर्ण स्टेडियम मध्ये फक्त नेमार-नेमार अश्या घोषणा होऊ लागल्या. यानंतर नेमारने आपले फुटबॉल कौशल्य दाखवले आणि पॅरिस समर्थकांसाठी चार शब्द बोलला.

नेमार पॅरिसमध्ये आला हे साऱ्या पॅरिस शहराला तर समजलेच होते पण ज्यांना कोणाला नाही समजले त्यांना समजावे किंवा साऱ्या जगाला समजावे म्हणून जगप्रसिद्ध आणि विश्वातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेल्या आयफेल टॉवरवर विद्युत रोषणाईने नेमारचे स्वागत करण्यात आले. आजघडीला सोशल मीडियाचा विचार केला तर नेमार हा पॅरिस सेंट जर्मेन या क्लबपेक्षा मोठा ब्रँड म्हणून समोर येत आहे.

नेमारचे फेसबुक वरील फॉलोवर्स – ६ कोटी, ५ लाखांपेक्षा जास्त
पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे फेसबुक वरील फॉलोवर्स – ३ कोटी, ७ लाखांपेक्षा जास्त

नेमारचे ट्विटर वरील फॉलोवर्स – ३ कोटीपेक्षा जास्त
पीएसजी क्लबचे ट्विटर वरील फॉलोवर्स – जवळजवळ ५० लाख फक्त

नेमारचे इंस्टाग्राम वरील फॉलोवर्स – जवळजवळ ८ कोटी
पीएसजी क्लबचे इंस्टाग्राम वरील फॉलोवर्स – जवळजवळ ८१ लाख

 

आयफेल टॉवरची विद्युत रोषणाई: