HWL 2017: इंग्लंडविरुद्ध भारत पहिल्या विजयासाठी उत्सुक

भुवनेश्वर । ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीने राखत भारतीय संघ आज त्यांचा हॉकी वर्ल्डलीग मधील पुढचा सामना इंग्लंडशी खेळण्यासाठी सज्ज आहे.

इंग्लंड संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात जर्मनीकडून २-० अशी हार पत्करावी लागली होती. त्यामुळे इंग्लंडचा संघ विजयासाठी निश्चितच आतुर होऊन मैदानात उतरेल तर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयाने दिलेल्या हुलकावणीमुळे आज पुन्हा ती कसर भरून काढण्यासाठी मैदानात उतरेल.

इंग्लंडकडून ३९८ सामने खेळलेला बॅरी मिडलटन याकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे कारण इंग्लंडच्या या प्रतिभावंत मिडफील्डरने वेळोवेळी इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

३९८ सामन्यात बॅरीने ११३ गोल्स केलेत .त्याचप्रमाणे एस व्ही सुनील या भारतीय फॉरवर्ड खेळाडूकडे ही सर्वांच्या नजरा राहणार आहेत. भारताकडून फॉरवर्डमध्ये खेळताना या खेळाडूने २२३ मॅचेसमध्ये ६० गोल केले आहेत.

इंग्लंडचा संघ खालीलप्रमाणे: डेविड एम्स,लिअम आन्सेल,डेविड कॉन्डोन,ब्रेंडन क्रीड,ऍडम डिक्सन,जेम्स गॉल,हॅरी गिब्सन,मार्क ग्लेगहॉर्न,डेविड
गुडफील्ड,ख्रिस ग्रिफिथ्स,हॅरी मार्टिन,बॅरी मिडलटन,जॉर्जे पिनेर,फिल रोपेर,लिअम सॅनफोर्ड,लूक टेलर,सॅम वॉर्ड,हेनरी वेयर.

भारतीय संघ खालीलप्रमाणे: आकाश चिकटे,सुरज कारकेरा,दीपसन तिरके,अमित रोहिदास,वरून कुमार,बिरेंद्र लाकरा,हरमनप्रीत सिंग,रुपिंदर पाल
सिंग,मनप्रीत सिंग,एस के उथप्पा,चिंगलेनसाना सिंग,सुमित,कोठाजीत सिंग,आकाशदीप सिंग,ललित कुमार उपाध्याय,गुरजांत
सिंग,एस व्ही सुनील,मंदीप सिंग.