HWL 2017: आज भारतीय संघाचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी

0 566

आज पासून सुरु झालेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना गतवर्षीच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. ही लढत भुवनेश्वर शहरातील कलिंगा स्टेडिअमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. या सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स तसेच हॉटस्टारवर करण्यात येणार आहे.

तीनही आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या यजमान भारतीय संघाचा या स्पर्धेतही विजयी सुरवात करण्याचा प्रयत्न असेल. परंतु जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी होणारा हा सामना नक्कीच सोपा नसेल. पूल बी गटातून हे दोनही संघ खेळतील.

भारतीय संघाला याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कुकाबुरासमध्ये झालेल्या चॅम्पिअनस ट्रॉफीमध्ये तसेच अझलान शहा हॉकी स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.

यास्पर्धेत अव्वल आठच संघ सहभागी असल्याने स्पर्धेची रंगत वाढणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: