HWL 2017: भारतासमोर करो या मरो ! उपांत्यफेरीत प्रवेशासाठी आज बेल्जियमवर विजय अनिवार्य

हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारताचा सामना आज बेल्जियम संघाविरुद्ध होणार आहे.

भारत बेल्जियम विरुद्ध आतापर्यंत एकूण ७२ सामने खेळला आहे. त्यापैकी ४५ सामने जिंकलेला आहे. तर १७ सामने हरलेला आहे व १० सामने बरोबरीत राखण्यात बेल्जियम संघाला यश मिळाले आहे.

परंतु मागील ४ लढतीत भारतीय संघ बेल्जियम विरुद्ध ३ वेळा पराभूत झाला आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या एका सामन्यात मात्र भारताला विजय मिळाला आहे. गेल्या १५ सामन्यात १२ वेळा बेल्जियमने भारताला पराभूत केले असून भारताला केवळ ३ विजय मिळवता आले आहेत.

या स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाला खास कामगिरी करता आलेली नाही. संघ ३ साखळी सामने खेळला असून त्यात पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध १-१ अश्या बरोबरीत तर दुसरा सामना इंग्लड विरुद्ध २-३ अश्या फरकाने हरला आहे. तिसरा सामना जर्मनी विरुद्ध०-२ अश्या फरकाने भारत पराभूत झाला आहे.

जागतिक क्रमांकामध्ये बेल्जियम तिसऱ्या क्रमांकावर असून भारत सहाव्या क्रमांकावर आहे. हा सामना ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवरती संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे.