म्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला चेन्नई सुपर किंग्जकडून विशेष भेटवस्तू मिळाली आहे. चेन्नईने श्रीकांतला त्याचे नाव लिहलेली क्रमांक 7ची जर्सी भेट म्हणून दिली आहे.

याबद्दल चेन्नईचे आभार मानलेले ट्विट त्याने केले होते.

मात्र सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. यावर काहींनी ‘मला वाटले तू हैद्राबादचे समर्थन करशील’ आणि ‘तू हैद्राबादी असून चेन्नईचे समर्थन करत आहे’ असे ट्विट करून निराशा व्यक्त केली आहे.

 

25 वर्षीय श्रीकांतने 2018च्या राष्ट्रकूल स्पर्धेत मिश्र संघात सुवर्णपदक आणि एकेरीत रौप्यपदक मिळवले आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सध्या 8 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

पुण्यात चेन्नईचा बोलबाला, विजयाची शंभरी पार करणारा दुसराच संघ

– दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा सचिन

हॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड