Australian Open 2018: चतुर्थ मानांकित अलेक्झांडर झवेरव स्पर्धेतून बाहेर

मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या तिसऱ्या फेरीत चतुर्थ मानांकित अलेक्झांडर झवेरवला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्याला ह्येन चुंग या दक्षिण कोरियाच्या २१ वर्षीय खेळाडूने पराभूत केले.

५ सेट चाललेल्या सामन्यात ह्येन चुंगने अलेक्झांडर झवेरवला ५-७, ७-६, २-६, ६-३, ६-० असे पराभूत केले. अलेक्झांडर झवेरवला या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते.

हा सामना ३ तास २२ मिनिटे चालला. झवेरवने या संपूर्ण सामन्यात २१ बिनतोड सर्व्हिस तर ह्येन चुंगने ५ बिनतोड सर्व्हिस केल्या.

स्पर्धेत पहिल्या ५ खेळाडूंमध्ये मानांकन मिळालेल्या झवेरव हा पहिला खेळाडू आहे जो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ह्येन चुंग हा केवळ तिसरा दक्षिण कोरियाचा खेळाडू आहे ज्याने ग्रँडस्लॅमच्या उपउपांत्यपूर्व फेरीत केला आहे. चुंगचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना नोवाक जोकोविचशी होण्याची शक्यता आहे.