टेनिसमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा इतिहास आज घडला

मेलबर्न । आज ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या उपांत्यपूर्व सामन्यात टेनिस विश्वातील सर्वात मोठा इतिहास घडला. टेनिसच्या इतिहासात आज प्रथमच दक्षिण कोरियाच्या खेळाडूने ग्रँडस्लम स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

एटीपी क्रमवारीत ५८व्या स्थानावर असलेल्या ह्येन चुंगने एटीपी क्रमवारीत ९७व्या स्थानावर असलेल्या तेँनीस सॅन्डग्रेनला ६-४, ७-६, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्यफेरी गाठली. त्याचा आता उपांत्य फेरीचा सामना टोमास बर्डिच आणि रॉजर फेडरर यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

तो २००४नंतर या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठणारा सर्वात कमी रँकिंग असणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २००४मध्ये मराट सॅफिनने एटीपी क्रमवारीत ८६व्या स्थानी असताना उप्नात्यफेरीत प्रवेश केला होता.

तसेच २०१० नंतर ग्रँडस्लम उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चुंग हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१०मध्ये ह्याच ग्रँडस्लॅममध्ये मारिन चिलीचने सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅमची उपांत्यफेरी गाठली होती.

या कामगिरीमुळे तो दक्षिण आफ्रिकेचा एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार खेळाडू ठरणार आहे.