विराट म्हणतो मी काही रोबोट नाही !

कोलकाता । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांतीच्या गोष्टीवर मौन सोडले आहे. आपल्याला जेव्हा असे वाटेल की आपण थकलो आहे तेव्हा आपण विश्रांती घेऊ असे विराटने आज कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्धच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

विराटला या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात येणार आहे अशा वावड्या उठत होत्या. त्यावर बोलताना या खेळाडूने सर्व अफवा फेटाळून लावल्या.

“मी नक्कीच विश्रांती घेणार नाही. जर माझं शरीर म्हणत असेल की मी आता थकलो आहे तेव्हा मी निवड समितीला नक्की विचारेल. मी काही रोबोट नाही. तुम्ही माझी कातडीचा छेद करा आणि आणि रक्त पहा. ” असे विराट म्हणाला.

“खेळाडूंना विश्रांती द्यावी किंवा देऊ नये याबद्दल खूप चर्चा सुरु आहे. सगळे खेळाडू कमीतकमी ४० सामने दरवर्षी खेळतात. ३ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ११ खेळाडू क्रिकेट खेळतात परंतु सगळेच काही ४५ षटके फलंदाजी करत नाही किंवा सगळेच ३० षटके गोलंदाजी करत नाही. ” असेही विराट पुढेच म्हणाला.