ब्रॅडमन यांची सरासरी १०० न होण्याची जबाबदारी घेतली या खेळाडूने

आॅस्ट्रेलियाचे सर्वकालीन महान फलंदाज सर डाॅन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमध्ये 100 ची सरासरी गाठण्यासाठी  केवळ 4 धावा कमी पडल्या. त्यासाठी आॅस्ट्रेलियाचे माजी खेळाडू नील हार्वे स्वत:ला मागील 70 वर्षापासून जबाबदार धरत आहेत.

ब्रॅडमन यांच्या सोबत खेळणारे नील हार्वे इंग्लडचा फिरकी गोलंदाज एरिक होलीज इतकेच स्वत:ला जबाबदार धरत आहेत.

जेव्हा ब्रॅडमन हे आपला शेवटचा डाव खेळण्यासाठी मैदानात आले तेव्हा होलीज या इंग्लिश फिरकी गोलंदाजाने त्यांना शुन्यावर बाद केले होते.

नील हार्वेयांचा आज 90 (8 आॅक्टोबरला)  वा वाढ दिवस आहे. त्यांना  ब्रॅडमन यांनी 100 ची सरासरी न गाठल्याची खंत आहे. त्यावेळी  हार्वे यांना ब्रॅडमन हे एका अनोख्या विक्रमाला गवसणी घालणार आहेत याची जाणीव नव्हती.

ब्रॅडमन जेव्हा शेवटचा सामना खेळले त्यापुर्वी लिड्स येथील सामन्यात त्यावेळी युवा असलेल्या हार्वे यांनी पहिल्या डावात 112 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या डावात हार्वे मैदानात उतरले तेव्हा आॅस्ट्रेलियाला 4 धावा लागत होत्या. त्यांनी पहिल्याच चेंडूवर चौका मारत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे ब्रॅडमन यांची सरासरी 99.94 ची राहीली.

ब्रॅडमन यांनी 52 कसोटी सामन्यात 29 शतकांच्या मदतीने 6996 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी तब्बल 99.94 ची आहे.

महत्वाच्या बातम्या-