तेव्हाच घेणार युवराज सिंग क्रिकेटमधून निवृत्ती

बेंगलोर । युवराज सिंगने आपण फिटनेसमध्ये सतत फेल ठरलो असलो तरी २०१९ पर्यंत निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे.

या ३६ वर्षीय दिग्गज खेळाडूने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देताना महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०११ विश्वचषकात तर युवराज मालिकावीर राहिला आहे.

“मला माहित आहे की सतत फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरत आहे. परंतु मी काल फिटनेस टेस्ट पास झालो आहे. १७ वर्ष क्रिकेट खेळूनही मला अपयशाला सामोरे जावे लागत आहे. ” असे युवराज म्हणाला.

“मी अपयशाने खचून जात नाही. मी कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. मी अनेक पराभव पाहिले आहेत आणि तेच माझ्या यशाचे स्तंभ आहेत. ”
“एक चांगले जीवन बनण्यासाठी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनावे लागते. तुम्ही पराभूत झाले पाहिजे आणि ते तुम्हाला एक कणखर व्यक्ती बनवते. तुम्हाला ते एका उंचीवर नेते. “

आपल्या क्रिकेटमधील निवृत्तीवर भाष्य करताना तो म्हणाला, ” मी सध्या क्रिकेट खेळत आहे आणि मला माहित नाही मी कोणत्या प्रकारात क्रिकेट खेळत राहील.परंतु मी पूर्वीपेक्षा जास्त कष्ट घेत आहे. मी स्वतःला २०१९ पर्यंत खेळताना इच्छितो आणि मगच मी माझ्या कारकिर्दीचा निर्णय घेणार आहे. “

युवराजला श्रीलंका संघाविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत स्थान देण्यात आले नाही. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की त्याला दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ६ वनडे किंवा ३ टी२० मालिकेसाठी संघात स्थान मिळते का?