विंडीज विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…

गयाना। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात मंगळवारी(6 ऑगस्ट) तिसरा आणि टी20 मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. प्रोविडन्स स्टेडियमवर पार पडलेल्या या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकली.

या सामन्यातील भारताच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 42 चेंडूत नाबाद 65 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. रिषभला या टी20 मालिकेत पहिल्या दोन सामन्यात खास कामगिरी करता आली नव्हती. पण तिसऱ्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी करत अर्धशतकी खेळी केली.

याबद्दल सामना संपल्यानंतर रोहित शर्माबरोबर बोलताना रिषभ म्हणाला, ‘मी बर्‍याच काळापासून माझ्या प्रक्रियांवर विश्वास ठेवतो. जरी मी धावा करु शकलो नाही तरी मला प्रयत्न करायचे असतात आणि आज मला त्याचा निकाल मिळाला.’

‘मी जेव्हा खेळपट्टीवर होतो. तेव्हा मी चांगली भागीदारी करण्याचा आणि शेवटच्या 7-8 षटकात आक्रमक फटके मारण्याचा विचार केला होता.’

तसेच 21 वर्षीय रिषभ पुढे म्हणाला, ‘जेव्हा माझ्या योजना काम करत नाही. तेव्हा मी निराश होतो. पण त्याचवेळी मी या परिस्थितीत आणखी काय करु शकतो याचे मुल्यांकन करतो. आपण घेतलेल्या योग्य निर्णयाची अनेकदा अंमलबजावणी होत नाही. पण मी नेहमी माझ्या क्षमतेवर आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवतो.’

तसेच भारतीय संघात धोनीचा वारसदार या दृष्टीने रिषभकडे पाहण्यात येते. त्यामुळे त्याच्याकडून अनेकदा मोठ्या अपेक्षा केल्या जातात.

या अपेक्षांबद्दल रिषभ म्हणाला, ‘कधीकधी अपेक्षांमुळे मला दबाव जाणवतो. पण अनेकदा मी याचा आनंद घेतो. तसेच संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून आणि पूर्ण संघाकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास मिळतो. मी जरी अपयशी ठरलो तरी ते मला पाठींबा देणार आहेत, हे माहित आहे. हे वातावरण खेळाडूला कामगिरी करण्यासाठी अनूकूल आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सौरव गांगुली म्हणाला, ‘देवा भारतीय क्रिकेटची मदत कर’; जाणून घ्या कारण

२१ वर्षीय रिषभ पंतने मोडला एमएस धोनीचा हा खास विक्रम

असा पराक्रम करणारा रिषभ पंत पहिलाच भारतीय क्रिकेटपटू!