- Advertisement -

जे काही आहे ते धोनी भाईमुळेच! – केदार जाधव

0 145

आयपीएलच्या ११व्या मोसमात चेन्नईकडून संधी मिळालेल्या केदार जाधवने धोनीची जोरदार स्तुती केली आहे. आपण जे काही आहोत त्यात एमएस धोनीचा वाटा मोठा असल्याचेही केदारने म्हटले आहे. 

“माझा पुर्ण विश्नास आहे की एक वेगळा क्रिकेटपटू म्हणून माझा जो प्रवास सुरू आहे त्यात धोनी भाईचा वाटा मोठा आहे. धोनीनेच मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा गोलंदाजीची संधी दिली. मी कधी विचारही केला नव्हता की मी गोलंदाजी करु शकतो आणि संघासाठी विकेट्स घेवू शकतो.” असे केदार म्हणाला. 

“त्यामुळे या दिग्गजाच्या नेतृत्वाखाली पुन्हा चेन्नईकडून खेळायची संधी मिळणार आहे. आणि मी आधी कधीही खेळलो नसेल असा खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. धोनीबरोबर खेळताना एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. ” असेही तो पुढे म्हणाला. 

आयपीएलचा ११वा मोसम ७ एप्रील रोजी सुरू होणार असुन गतविजेत्या मुंबई आणि चेन्नई सामन्याने वानखेडे येथे सामन्याची सुरूवात होणार आहे. 

Comments
Loading...
%d bloggers like this: