एशियन गेम्स: डोळे मिटून १००मीटर शर्यत पूर्ण केली

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये रविवारी (26ऑगस्ट) 100 मीटरच्या शर्यतीत भारतीय धावपटू दूती चंदने डोळे मिटून शर्यत पूर्ण तर केली आणि रौप्यपदकही जिंकले आहे. तिला पदक नाही तर उत्कृष्ठ वेळ नोंदवायची होती, असे कारण तिने सांगितले.

भारताला पहिल्यांदाच 100 मीटरच्या शर्यतीत 20 वर्षानंतर पदक मिळाले आहे. तसेच ती आता 200 मीटरच्या शर्यतीसाठी  पात्र ठरली आहे. यावेळी तिने 23 सेंकदाचा वैयक्तिक वेळ नोंदवला आहे. चंदने हे पदक 11.32 सेंकदात पटकावले आहे. याच वेळेत तीने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या हायपरअड्रोजेनीजम पॉलिसीनुसार तिला 2014च्या राष्ट्रकुलमध्ये सहभागी होता आले नाही. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाला अधिक पुरावे सादर न करता आल्याने कोर्ट ऑफ अरबिट्रेशनने तिला परत शर्यतीत सहभागी होण्याची संधी दिली.

“2014 वर्ष माझ्यासाठी खुप कठिण होते. चार वर्षानंतर परत ट्रॅकवर येऊन पदक जिंकणे माझ्यासाठी खुप मोठी बाब आहे”, असे चंद म्हणाली.

“हे माझ्यासाठी ऑलिंपिकसारखेच आहे. यासाठी मी प्रत्येक सत्राला सहा तास सराव केला आहे”, असे 22 वर्षीय चंद म्हणाली.

तसेच चंद ही तिसरीच भारतीय आहे जी महिलांच्या 100मीटरसाठी रियो ऑलिंपिकला पात्र ठरली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: युट्युबवरुन गिरवले भालाफेकचे धडे, मिळवले सुवर्णपदक

एशियन गेम्स: ती चूक केली नसती तर या भारतीय धावपटूला मिळाले असते कांस्यपदक